चोरीच्या दहा मोटार सायकलींसह चोरटे अटक

On: September 21, 2024 10:36 PM

जळगाव : चोरीच्या दहा मोटारसायकल सह तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने जेरबंद केले आहे. विशाल गोपाल भोई (रा. टाकरखेडा ता. जामनेर), देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (सांळुखे), (रा. टाकरखेडा। ता.जामनेर जि. जळगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. 

विशाल गोपाल भोई हा चोरीची मोटर सायकल वापरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथक त्याच्या मागावरील पोलीस पथकाने त्याला अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने त्याचे दोघे साथीदार देवानंद उर्फ आनंद सुरडकर आणि सुरज अशोक पारधी यांची नावे कथन केली. त्यामुळे त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या ताब्यातून 4 लाख 33 हजार रुपये किमतीच्या 10 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. 

जळगाव शहर, जिल्हा पेठ आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील दाखल मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोउपनिरी गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हॅकॉ गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment