जळगाव : पुणे, सातारा व कोल्हापुर जिल्ह्यात गुन्हे दाखल असलेल्या दोघा आरोपींकडुन सात गावठी कट्टे (पिस्टल), 10 जिवंत काडतुस, दोन मोवाईल हॅन्डसेट व एक मोटार सायकल असा एकुण 2 लाख 90 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केला आहे. सागर शरणम रणसीरे (पुणे) आणि मनोज राजेंद्र खांडेकर (जुळेवाडी, ता. कराड, जिल्हा सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील लासुर ते हातेड रोडवरील पाटचारी पुलाजवळ 20 सप्टेबर रोजी सागर रणसिरे आणि मनोज खांडेकर या दोघांची मिळालेल्या माहितीच्या आधारे अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून दहा जिवंत काडतुस, सात गावठी कट्टे, दोन मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या पथकातील हे.कॉ. राकेश पाटील, पो.ना. शशीकांत, पो.कॉ. रावसाहेब पाटील, पो.कॉ. चेतन महाजन तसेच प्रदिप बारकू शिरसाठ (होमगार्ड) व पोलीस मित्र महेश दत्तु देवराज कोळी, नरेंद्र मोरे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.