चोरीच्या मोटारसायकलीसह दोघे चोरटे ताब्यात

On: September 22, 2024 5:25 PM

जळगाव : चोरीची मोटर सायकल व मोटार सायकल चोरी करतांना वापरलेली चोरीची मोटरसायकल अशा दोन मोटार सायकलीं सह दोघा चोरट्यांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. उमर फारुख कलीम अहमद आणि मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास (दोघे राहणार मालेगाव-नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. 

दिनांक 13 व 14 सप्टेंबर च्या रात्री घाट रोड परिसरातून एक मोटर सायकल चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. या चोरीच्या तपासात तपासणी करण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे दोघा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीअंती त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून संबंधित चोरीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. याशिवाय त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या मोटरसायकल बाबत शांतीनगर पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल सोनवणे, पोलिस नाईक भुषण पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन, नरेद्र चौधरी आदींनी या तपास कामी सहभाग घेतला पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे व पो. कॉ. ज्ञानेश्वर पाटोळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment