भोंदुबाबाच्या तावडीतून  अल्पवयीन मुलीची सुटका

On: September 24, 2024 11:30 AM

जळगाव : जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याच्या घटनेतील भोंदूबाबासह त्याच्या दोघा साथीदारांना तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली आहे. अटकेतील दोघे सध्या  पोलिस कोठडीत आहेत. सुरेश भगवान भिल (भोंदूबाबा -रा. शेंदूर्णी, ता. जामनेर), रवी धनराज हिवाळे (२५) आणि लहू शिवाजी गायकवाड (दोघे रा. म्हाडा कालनी, पहूर, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीडित मुलीचा गुप्त धन काढण्यासाठी उपयोग करण्याचा त्यांचा उद्देश असावा असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने देखील तपास केला जात आहे.

11 सप्टेंबर रोजी या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. पहूर पोलिस स्टेशनला या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान पोलिस पथक सोलापूर येथे पोहोचल्यानंतर संबंधित आरोपी तैलगणा राज्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर लागलीच पोलिस पथक पंचकुडा या गावी पोहोचले. या गावातून पीडित मुलीसह तीन जणांना एका घरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. 

पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, रवींद्र देशमुख, हेकॉ. दीपक सुरवाडे, पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे विनोद या तपासकामी सहभाग घेतला. पीडित मुलीच्या महिला दक्षता विभागाला दिलेल्या जबाबावरुन विशेष न्यायालयाने अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमानुसार वाढीव कलमे लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment