चाकू हल्ल्यात विवाहिता ठार- खूनाचा गुन्हा दाखल

On: September 26, 2024 9:00 AM
crimeduniya

जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे हल्ल्यात विवाहिता जखमी होऊन ठार झाल्याची घटना 25 सप्टेंबर च्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेच्या वेळी मध्यस्थी करणारा सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. सोनाली महेंद्र कोळी असे चाकू हल्ल्यात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे साकेगाव परिसरात खळबळ माजली आहे. 

सागर रमेश कोळी या संशयित हल्लेखोराविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर कोळी याने महिलेच्या पोटावर पाठीवर चाकूचे जबर घाव केले. त्यात ती ठार झाली. तिचा बचाव करण्यासाठी विनोद सुभाष कुंभार हा सुरक्षा रक्षक आला असता त्याला सागर कोळी याने तू आमच्या मध्ये पडू नकोस असा दम देत त्याला जखमी केले त्यात त्याच्या बोटाची करंगळीला दुखापत झाली आहे. विनोद कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment