सिरत-उल-नबीची सभा उत्साहात

On: September 26, 2024 2:06 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहुर येथे हिंदू मुस्लिम बांधवांसाठी ‘जलसा सिरात-उल-नबी’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर  तालुका सिरत कमिटी आणि पहुर येथील स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे  वाजिद कादरी तर विशेष अतिथी म्हणून सोहेल अमीर शेख यांनी सहभाग घेतला होता. 

या प्रसंगी मोठ्या संख्येने हिंदू – मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.  कार्यक्रमाची सुरुवात हाफिज उमर यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. त्यानंतर सोहेल अमीर शेख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पैगंबरांच्या जीवनाचा वृत्तांत हिंदू – मुस्लिम बांधवांसमोर विषद केला. त्यानंतर हिंदू बांधवांनी आपले विचार मांडले.

पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, भास्कर पाटील (सरपंच पहुर), प्रदीप लोढा (भाजप), राजदार पांडे, रामेश्वर पाटील, संजय महेश पाटील, डॉ. प्रशांत पंधारे, अरुण घोलप आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment