गावठी पिस्टल, मॅगझीनसह एकास अटक

On: September 26, 2024 4:28 PM

जळगाव : एक गावठी पिस्टल व दोन मॅगझीनसह एकास रावेर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. अब्दुल अनिस अब्दुल मज्जीद (मुस्लिम कॉलनी खडकारोड भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत कुसुंबा ते लालमाती रस्त्यावरील जल्लार शहाबाबाच्या दर्ग्याजवळ एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांना समजली होती. 

त्या माहितीच्या आधारे सापळा रचून अब्दुल अनिस यास शिताफीने ताब्यात घेत त्याच्या कब्जातून एक गावठी पिस्टल, आणि दोन मॅगझीन असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ विनोद पाटील, ईश्वर देशमुख, पोकॉ राहुल महाजन, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ ईश्वर देशमुख, पोकॉ राहुल महाजन यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment