नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणा-या चोरट्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलीसांच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले आहे. 10 सप्टेंबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास येवला अंदरसुल रस्त्यावरील जीवन फर्निचर या दुकानातून चोरट्यांनी एलईडी टीव्ही, सिलिंग फॅन, कुलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांब्याची व पितळेची भांडी असा एकूण 2 लाख 70 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. या घटने प्रकरणी येवला तालुका पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी गुलाम रफिक शेख आणि दीपक ठुने या दोघा चोरट्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती तपासांती निष्पन्न झाली. त्या माहितीच्या आधारे या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती वाहन, 3 एल.ई.डी. टिव्ही, 77 किलो वजनाची तांब्याची भांडी व 14 किलो वजनाची पितळाची भांडी असा एकूण 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथक त्यांच्या मागावर असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक यांच्यासह पोउनि हर्षवर्धन बहिर, स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभीर, येवला तालुका पो.स्टे. चे पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील, राजेंद्र बिन्नर, सचिन वैरागर, दिनकर पारधी, गणेश बागुल, सागर बनकर, नितीन पानसरे, पंकज शिंदे, दिपक जगताप, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल गिरीष निकुंभ, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या तपास कामी सहभाग घेतला