गॅस सिलिंडर साठा, रिक्षासह एक ताब्यात

On: September 30, 2024 10:19 AM

जळगाव : खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या जमा केलेले 73 गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे मशीन, नळ्या व एक रिक्षा अशा 5 लाख 29 हजार 600 रुपयांच्या मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे. 29 सप्टेंबर रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरसोली येथे ही कारवाई केली. सादिक पिंजारी असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. सादिक पिंजारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेका विजय पाटील, हरिलाल पाटील, पोकों प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, शुद्धोधन ढवळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment