हद्दपार आरोपी मोकाट फिरतांना ताब्यात

On: September 30, 2024 5:58 PM

जळगाव : जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनच्या अभिलेख्यावरील हद्दपार आरोपी महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यातील आरोपी महेंद्र महाजन हा हद्दपार असताना देखील तो जळगाव शहरात मोकाट फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला अजिंठा चौफुली परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, पोना प्रदिप चौधरी, पोकॉ रतन गिते, पोकॉ साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल होण्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment