दोघा चोरट्यांकडून दोन दुचाकी व मोबाईल हस्तगत

On: October 2, 2024 10:20 PM

जळगाव : दोघा दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या दोन मोटरसायकल व एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शोएब अफजलखान पठाण व शेख आवेश शेख मोहम्मद (दोघे रा. पिंप्राळा हुडको) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. अटकेतील आरोपीतांनी दोन मोटार सायकली जळगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीतुन, एक शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतुन, एक मोबाईल जळगांव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

जळगांव शहारातील चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ रवि नरवाडे, सफौ संजय हिवरकर, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ हरीलाल पाटील, पो.ना. प्रविण भालेराव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment