तिघा गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुका अशा तीन पोलीस स्टेशनच्या अभिलेख्यावरील हे गुन्हेगार आहेत. विशाल दशरथ चौधरी (अमळनेर), सुनिल ऊर्फ सल्या लक्ष्मण पाटील (पारोळा) आणि वैभव विजय सपकाळे (असोदा – जळगाव) अशी या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. 

भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत विशाल दशरथ चौधरी याच्याविरुध्द सात, सुनील पाटील यांच्या विरुद्ध अकरा गुन्हे आणि भादवि तसेच दारूबंदी कायद्याअंतर्गत वैभव विजय सपकाळे  याच्याविरुव्द पाच गुन्हे दाखल आहेत. विशाल चौधरी याची मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे तसेच सुनील पाटील आणि वैभव सपकाळे या दोघांची नागपूर कारागृहात परवानगी करण्यात आली आहे. अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा अशा तिघांनी आपापल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेमार्फत पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here