बंदुकीतून गोळी सुटल्याने गुन्हेगार तरुण जखमी

On: October 5, 2024 6:56 AM

जळगाव : विनापरवाना बंदुकीसोबत आरशात बघून खेळत असताना अचानक सुटलेली गोळी डाव्या गालाला चाटून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली. चाळीसगाव बस स्टँड परिसरात गुरुवारी घडलेल्या या घटनेत मंजितसिंग दिलीपसिंग बावरी हा वीस वर्षाचा तरुण जखमी झाला आहे. 

जखमी मंजीतसिंग याला परिसरातील लोकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी मंजितसिंग यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मंजीतसिंग बावरी यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून प्रतिबंधक कारवाई देखील झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment