विवाहितेला गर्भवती करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा 

On: October 5, 2024 8:12 AM

जळगाव : विवाहितेचा तिच्या पतीसोबत सुरु असलेल्या वादाचा गैरफायदा घेत तरुणाने तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत संबंध प्रस्थापित केले. या संबंधातून विवाहिता गर्भवती झाली. मात्र तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने हवालदील झालेल्या विवाहितेने तुषार राजेंद्र आहिरे (गोपाळपुरा-जळगाव) या तरुणाविरुद्ध शनी पेठ पोलीस स्टेशनला 3 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. तुषार अहिरे यास अटक करण्यात आली आहे. 

सन 2018 ते 30 सप्टेंबर 2024 या या कालावधीत हा प्रकार घडला आहे. शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीत पीडित महिला आपल्या पतीसह राहते. तिचे तिच्या पतीसोबत नेहमी भांडण होत असे. पती-पत्नीच्या भांडणाचा आणि ओळखीचा गैरफायदा तुषार याने घेतला. त्याने तिच्यासोबत संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले. मात्र ऐनवेळी तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. या गुन्ह्याचा पुढील तपास शनिपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment