चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना अटक 

On: October 6, 2024 9:12 AM

जळगाव : चोरीच्या चार मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याणेहोळ ता.धरणगाव) आणि गोपाल सुरेश भिल (रा.वराड ता. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा मोटरसायकल चोरट्यांची नावे आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटरसायकल चोरीचे दोन आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल एक असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एक मोटरसायकल चोरीबाबतचा तपास सुरु आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, भुषण पाटील, महेश सोमवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment