विवाहित मधुबाला बहकली, तुषार सोबत घसरली — गर्भवती झाल्यावर लग्नास नकार ऐकून बिथरली

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : मधुबाला (काल्पनिक नाव) वयात येताच तिच्या पालकांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास सुरुवात केली. मधुबाला जेमतेम अठरा वर्षाची होती. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तारुण्यात पदार्पण करताच तिचे लग्न झाले. लग्नानंतर ती रावेर तालुक्यात पतीसोबत सासरी राहू लागली. रावेर तालुक्यात हवा तसा रोजगार नसल्यामुळे तिच्या पतीने जळगावला येण्याचे निश्चित केले. ती तिच्या पतीसह जळगाव येथे राहण्यास आली. तिच्या पतीला जळगाव शहरात एका दुकानावर काम मिळाले. सकाळी नऊ वाजता तिचा पती जेवणाचा टिफिन सोबत घेऊन जात असे. सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिचा पती दुकानावर नोकरी करत होता. घरी येईपर्यंत त्याला रात्रीचे दहा वाजत होते. अशा प्रकारे पूर्ण दिवस त्याचा दुकानावर जात होता. या कालावधीत मधुबाला घरी एकटीच राहत होती. 

घरी एकटी असलेली मधुबाला मोबाईलवर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम असे विविध ॲप्स हाताळत होती. ती मोबाईल हाताळण्यात जणू काही पारंगत झाली होती. रात्रीच्या वेळी आणि रविवारी सुटीच्या दिवशी तिला तिच्या पतीचा पूर्ण सहवास लाभत होता. लग्नानंतर तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला त्यानंतर पाच वर्षांनी तिला दुसऱ्या वेळेसही पुत्ररत्नाचा लाभ झाला. अशाप्रकारे तिच्या संसार वेलीवर दोन पुत्र विराजमान झाले. “हम दो हमारे दो” असा तिचा चौकोनी संसार सुरळीत सुरु होता. मात्र का कुणास ठाऊक तिच्या संसाराला कोणते तरी ग्रहण लागले. तिचा पती तिच्यासोबत नेहमी वाद घालत होता. ती देखील तिच्या पतीसोबत वाद घालत होती. अशा प्रकारे पती-पत्नीचा वाद सुरुच होता. 

सन 2018 चा तो काळ होता. तिच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. तिला मोबाईल हाताळण्याचा नाद लागला होता. फावल्या वेळात ती मोबाईलवर व्यस्त रहात होती. त्यातल्या त्यात तिला फेसबुक हाताळण्याची सवय लागली. तिला नवनवीन फेसबुक फ्रेंड मिळाले. या कालावधीत फेसबुकवर तिची तुषार राजेंद्र अहिरे या तरुणासोबत मैत्री झाली. तुषार तिच्यापेक्षा तीन वर्ष वयाने मोठा होता. दोघे एकमेकांसोबत फेसबुक वर चॅटिंग करु लागले. सुरुवातीला हाय – हॅलो ने सुरुवात झालेली त्यांची मैत्री आणि चॅटिंग नंतर थेट संभाषणात परावर्तीत झाली. त्याला ती आवडत होती. त्यामुळे त्याने त्याच्या एका मित्राकडून तिचा मोबाईल नंबर शिताफीने मिळवला. अंधारात दगड मारल्यागत त्या क्रमांकावर त्याने कॉल केला असता पलीकडून त्याच्या कर्ण पटलावर मंजुळ स्वर आला. त्या मंजुळ स्वर असलेल्या तरुण विवाहितेला त्याने नाव विचारले. तिने तिचे नाव मधुबाला सांगितले. त्यामुळे आपला कॉल हा रॉंग नंबर नसून करेक्ट नंबर असल्याची त्याची खात्री झाली. त्याने आपला परिचय तिला दिला. आपण दोघे फेसबुक फ्रेंड असल्याचे त्याने तिला कथन केले. अशाप्रकारे दोघांची व्हाईस कॉल मैत्री देखील झाली. दोघेजण एकमेकांसोबत बराच वेळ मोबाइलवर गप्पा करु लागले. त्यानंतर दोघे प्रत्यक्ष भेटू लागले. दरम्यानच्या कालावधीत मधुबालाचा पती दुकानावर राब – राब राबत असे आणि ती इकडे तुषार सोबत चॅटिंग, कॉलिंगसह भेट घेण्यात व्यस्त रहात होती. अशा प्रकारे दिवसा मागून दिवस जात होते. 

मधुबालाच्या घरची परिस्थिती आणि वातावरण आता तुषारला परिचित झाले होते. तिचे तिच्या पतीसोबत जमत नसल्याचे देखील त्याला समजले होते. त्यामुळे मधुबाला नेहमी उदास रहात असल्याचे त्याला जाणवले. तिची सर्व प्रकारची उदासी केवळ आपणच दूर करु शकतो याची त्याला खात्री झाली. तिच्या खुशीसाठीच आपला जन्म झाला असल्याचे त्याला वाटू लागले. तिची खुशी आणि उदासी यामधील खुशीचा गॅप अर्थात पोकळी भरण्याचा त्याने जोरदार प्रयत्न केला. तिच्या उदासीचे मतलबी भांडवल करुन गैरफायदा घेण्याचा त्याने मनाशी ठाम निश्चय केला. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भरपूर स्कोप असल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे त्याने तिच्यासोबत अधिकाधिक जवळीक साधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. त्यात तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील झाला. 

मधुबाला रहात असलेल्या परिसरात त्याच्या एका मित्राचे दुकान होते. त्या दुकानावर तुषारने मुद्दाम येऊन बसण्यास सुरुवात केली . त्या दुकानावर बसून तो तिची टेहाळणी करु लागला. तिचा पती केव्हा एकदा दुकानावर जातो याकडे तो बारीक लक्ष ठेवू लागला. मधुबालाचा पती जेवणाचा टिफिन घेऊन घराबाहेर पडला म्हणजे त्याला हायसे वाटत होते. दृष्टी धुसर होईपर्यंत मधुबालाचा पती लांब अंतरावर गेला म्हणजे तुषार तिच्या घरात येऊ लागला. “तु मला खुप आवडते, तु तुझ्या पतीकडून घटस्फोट घे, मी तुझ्यासोबत लग्न करेन” अशी गोड बतावणी करुन तो तिच्याशी जवळीक साधू लागला. कधी कधी तो तिला खाण्यासाठी सफरचंद, डाळिंब, मिठाई आणून देऊ लागला. तुषार आपली किती काळजी घेतो हे बघून ती मनातल्या मनात सुखावत होती. तिला देखील तुषार आवडू लागला. तो तिची आपुलकीने विचारपूस करत तिला काय हवं काय नको हे बघत होता. तुझ्या पतीपेक्षा मी तुला राणीसारखी सुखात ठेवेल. तुझ्या डोक्यावर सोनेरी मुकुट ठेवेल. तू माझ्यावर राज्य करशील अशी बतावणी करुन तो तिला खुश करु लागला. त्याच्या गोड बोलण्याला ती भुलत गेली. लग्नाचे अमीष दाखवून तो तिच्या अंगाला स्पर्श करु लागला. परपुरुषाचा स्पर्श होताच तिच्या रोमारोमात उत्साह संचारत होता. तिच्या शरीरातील हार्मोन्स मोठ्या प्रमाणात जागृत झाल्याने ती त्याच्या स्पर्शाला बळी पडत गेली. तिची मुक संमती बघून त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. 

दिनांक 4 जुलै 2024 हा तुषारचा वाढदिवस होता. वाढदिवस असल्याच्या खुशीत गोड बोलून तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी देखील त्याने तिला स्पर्श करुन तिला मोहवले. एकांताची संधी बघून त्याने हॉटेलच्या रुममध्ये तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याला तिच्यासोबत शरीरसुख घेण्याची जणू काही चटकच लागली. तो वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करू लागला. बघता बघता या गोष्टीची भनक तिच्या पतीला लागली. आपली पत्नी परपुरुषासोबत संबंध ठेवत असल्याचे समजल्यानंतर तो संतप्त झाला. त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आपली पत्नी हाताबाहेर जात असल्याचे समजल्यानंतर तो तिला आपल्या गावी रावेर तालुक्यात घेऊन गेला. 

दरम्यानच्या कालावधीत तिने तुषार सोबत संपर्क साधून त्याला सांगितले की माझ्या पतीने मला सोडून दिले आहे.  आता तू माझ्याशी लग्न करण्याची वेळ आली आहे. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर संबंध ठेवू नकोस. तिने अशाप्रकारे त्याला हकीकत कथन केल्यानंतर देखील तो तिला म्हणाला की तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. अशा प्रकारच्या भुलथापा देत त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला. 

दरम्यानच्या कालावधीत मधुबाला आपल्या दोघा मुलांसह जळगावला वेगळी राहू लागली. ती जळगाव शहरात एकटी रहात असल्याचे समजल्यानंतर तिला भेटण्यासाठी तुषारला रान मोकळे झाले. 

मनुष्य एखादे काम विसरु शकतो. मात्र निसर्ग आपले काम विसरत नाही. मधुबाला हीच्या गर्भाला गोलाई देण्याचे निसर्गाने आपले काम चोखपणे बजावण्यास सुरुवात केली होती. आपण गर्भवती झाल्याची कल्पना तिने तुषारला सप्टेंबर महिन्यात दिली. मी तुझ्या बाळाची आई होणार असल्याचे तिने त्याला सांगितले. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याने प्रेग्नंसी तपासण्याची किट आणली. त्या किटच्या माध्यमातून त्याने तिची तपासणी केली असता ती खरोखर गर्भवती असल्याचे त्याला समजले. ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तो भांबावला. काही वेळाने भानावर येत तो तिला म्हणाला की मी तुला गर्भपाताच्या गोळ्या आणून देतो, आपण तुझा गर्भपात करु. मला तुझ्या सोबत लग्न करायचे नाही असे तुषारचे बोलणे ऐकल्यानंतर ती मनातून घाबरली. त्यामुळे तिने त्याला खडसावण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. 

ऑगस्ट महिन्यात तुषार तिला भेटण्यासाठी तिच्या रुमवर आला असता तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मी गर्भपात करणार नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तु मला तुझ्या घरी घेवून चल असे म्हणत तीने त्याच्यामागे लग्नाचा तगादा सुरु केला. तुषार आपल्या सोबत लग्न करत नसल्याची खात्री पटल्यानंतर तिने शनिपेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करत आहेत. (या कथेतील पीडित महिलेचे मधुबाला हे नाव काल्पनिक आहे) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here