अनैतिक संबंधांच्या संशयातून डॉक्टरला चौघांची मारहाण

जळगाव : एका डॉक्टरचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय एकाला आला. त्या संशयातून त्या विवाहितेच्या पतीने इतरांच्या मदतीने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना 4 ऑक्टोबरच्या रात्री घडली.  या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत 29 वर्षाच्या या डॉक्टरला त्याच्या घराजवळ जाऊन लोखंडी रॉड व फायटरने समुहाने मारहाण केली. जखमी डॉक्टरने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत मांडली. डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यास मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भुषण जैतकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here