शिक्षक आपल्या दारी उपक्रम

चोपडा तालुक्यातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा देवगाव येथील उपक्रमशील शिक्षक किशोर बाळाराम पाटील यांच्या संकल्पनेतुन ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासोबत नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु या माध्यमातून “शिक्षक आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे पालकांच्या भेटी घेऊन सुरवातीला जनजागृती करण्यात आली. शिक्षक आपल्या घरी आल्याने पालक व विद्यार्थी वर्ग अवाक झाला.

शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. चोपडा पं. स. गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गावाचे सरपंच विकास महाजन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश साळुंखे, पोलीस पाटील अंकिता पाटील तसेच पालक यांच्या सहकार्याने हा उपक्रम प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यासाची माहिती देण्यात येत आहे या शैक्षणिक उपक्रमाचे पालक वर्गातून स्वागत होत आहे.

विद्यार्थी सुद्धा शिक्षकांना चांगला प्रतिसाद देत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सदस्य सुद्धा शिक्षकांसोबत पालक भेटी घेत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील यांनी सांगितले. शाळेतील शिक्षक मृणालिनी पाटील, अलका पाटील तसेच केशवानंद सैंदाणे हे आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास करून घेत आहेत. भेटी दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here