विजेचा शॉक लागल्याने मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

On: October 11, 2024 4:05 PM

जळगाव : इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जखमी अवस्थेतील अनोळखी तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अनोळखी मयत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून मृतदेह रुग्णालयात राखून ठेवण्यात आला आहे. 

दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन नजीक रेल्वे पुलाजवळ साधारण पंचवीस वर्षे वयाचा एका अनोळखी तरुणा इलेक्ट्रिक शॉक लागून जखमी झाला होता. वैद्यकीय उपचार कामी त्यास जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 ऑक्टोबर रोजी या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले. 

मयत अनोळखी तरुणाच्या वारसांचा शोध लागून त्याची  ओळख पटण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास रामानंदनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे यांच्याशी 7738341022 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment