जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) : – सूक्ष्म सिंचन आणि कृषिक्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने आज रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत दुसरी तिमाही व सहामाहिचे आर्थिक निकाल जाहीर केले. यात कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न २,६६९.८ कोटी रुपये इतके इबिडा ३१७.५ कोटी इतका आहे. कंपनी व उपकंपन्यामधील सूक्ष्म सिंचन विभाग, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, नूतनीकरणीय ऊर्जा समाधान, उती संवर्धन, वित्तीय सेवा आणि इतर कृषी उत्पादनांच्या मिळून हे एकूण उत्पन्न आहे. 

तिमाही निकालाचे वैशिष्ट्ये – एकत्रित उत्पन्न: ₹ १,१९२.० कोटी रुपये. इबिडा : ₹ १३८.७ कोटी रुपये

सहामाही निकालाचे वैशिष्ट्ये – एकत्रित उत्पन्न: ₹ २,६६९.८ कोटी रुपये, इबिडा : ₹ ३१७.५ कोटी रुपये

अनिल जैन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की,  महाराष्ट्रासह भारतातील विस्तारित पावसामुळे जैन इरिगेशनच्या तिमाहीच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पेरणी क्षेत्राच्या वाढीमुळे उत्पादनास प्रोत्साहन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कॅश फ्लो सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत आणि मायक्रो इरिगेशन सिस्टिम, पाईप्स आणि टिशू कल्चर क्षेत्रांमध्ये मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, सोलर पंप्स, मोठ्या व्यासाचे एचडीपीई पाईप्स आणि आंतरराष्ट्रीय मागणीत वाढ झाल्यामुळे सकारात्मक परिणाम साधता येईल.

अलीकडेच जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करांतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देईल. याशिवाय, उच्च-उत्पादनक्षमता असलेल्या कॉफी शेती आणि कुफ्री फ्रायोएम बटाटा जातीसह नवीन प्रयोगातून टिशू कल्चरसाठी नवीन मागणी ही वाढेल. ह्या करारांमुळे आमच्या इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here