नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना आतंकवाद विरोधी उत्कृष्ठ कारवाया केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दक्षता पदक घोषित करण्यात आले आहे. देशाच्या विविध राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना हे पदक आज 31 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जयंत मिना आणि विक्रम देशमाने या दोघा पोलिस अधिक्षकांचा या सन्मानात समावेश आहे.
विशेष कामगिरी पथकातील एसीपी – 1 जगदीश सेल डिसीपी सुहेल शर्मा, पोलिस निरीक्षक हेमंत चंद्रकांत पाटील, अजय सावंत, रमाकांत पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील शिवाजी चव्हाण, चंद्रकांत लोहकरे, रवींद्र गवारी यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय उत्कृष्ठ गुन्हे प्रकटीकरण केल्याबद्दल पोलिस उप अधीक्षक कृषिकेश रावले, पोलिस निरीक्षक शंकर विठ्ठल शेळके, श्रीमती राधिका गिरधर भावसार, समीर प्रकाश लोणकर, दिनेश त्र्यंबक लबदे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज विनय चक्रे, मनोज श्रीराम चौधरी, विवेकानंद बलभीम पाटील, उमेश शामराव बोरसे (येवला शहर पो. स्टे) आदींचा समावेश आहे.