प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक जॉनी बख्शी कालवश

On: September 5, 2020 5:38 PM

प्रसिद्ध सिने निर्माता-दिग्दर्शक जॉनी बख्शी यांनी शुक्रवारी रात्री शेवटचा श्वास घेत य जगाचा निरोप घेतला आहे. शुक्रवारी 4 सप्टेंबरच्या रात्री त्यांचे निधन झाले. जॉनी बख्शी यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत अभिनय केला आहे. जॉनी बख्शी हे एक उत्तम दिग्दर्शक व निर्मातादेखील होते. राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोव्हर अभिनीत ‘खुदाई’ सिनेमाची निर्मिती त्यांची होती.

जॉनी यांनी मंजिलें और भी हैं, मेरा दोस्त मेरा दुश्मन, फिर तेरी कहानी याद आई आणि इस रात की सुबह नही सारख्या अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. जॉनी बख्शी यांचा अखेरचा सिनेमा ‘कजरारे’. हा सन 2010मध्ये आला होता. त्यात हिमेश रेशमियासह सारा लोरेन आणि अमृता सिंग यांनी मुख्य भुमिका केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment