रायफल चोरीच्या घटनेतील तिघांना पोलिस कोठडी

On: November 5, 2024 10:14 AM

जळगाव : वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मधून रायफल चोरीच्या घटनेतील तिघांना भुसावळ न्यायालयाने पांच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लीलाधर ऊर्फ नीलेश बळीराम थाटे यांच्यासह निखिल कडू थाटे आणि तुषार विश्वनाथ पाटील अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला 197/24 भारतीय न्याय संहिता 305 (ए), 331 (3), 331 (4) नुसार 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरणगाव स्थित आयुध निर्माणीमध्ये निर्मिती होणाऱ्या काडतूसांच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-47 सह एकूण पाच रायफलींची 21 ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना 28 ऑक्टोबर रोजी सकाळी दोन एके 47 रायफल आणि एक गलील रायफल बेवारस अवस्थेत जाडगाव रेल्वे रुळावर आढळून आल्या. दरम्यान संशयित आरोपी लीलाधार थाटे हा 4 नोव्हेंबर रोजी एटीएस नाशिक युनिट कडे एक एके 47 रायफल आणि गलील रायफल सह हजर झाला. एटीएस युनिटणे त्यास वरणगाव पोलिस स्टेशनला हजर केले. ताब्यातील नीलेश थाटे याने या गुन्ह्यात त्याच्या सोबत निखिल कडू थाटे आणि तुषार विश्वनाथ पाटील यांचा सहभाग असल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली. तिघांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment