निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम

On: November 5, 2024 11:57 AM

जळगाव दि,४ (प्रतिनिधी) – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला गोल्ड मेडल बहाल करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पदवी प्रदान सोहळा होणार आहे.

आयआयटीची प्रवेश परीक्षा परिश्रमपूर्वक  उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ” इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट” आणि क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”  सह अनेक पुरस्कार प्राप्त असून पालवी सध्या गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. पालवीचे आईवडील विजय आणि नीलिमा जैन यांचेही अभिनंदन होते आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुकासह अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment