अपक्ष उमेदवाराच्या गाडीच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढवणाऱ्या उमेदवाराच्या गाडीच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील राजूर ते नांदगाव दरम्यान प्रचार रॅलीत सहभागी असताना या अपक्ष उमेदवाराच्या गाडीच्या दिशेने गोळीबार झाला होता.

या घटनेनंतर गोळीबार करणारे पसार झाले होते. या घटने प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उघडकीस आलेल्या या घटनेला राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

दिपक दादाराव शेजोळे (रा. येवती ता. बोदवड) व आयुष उर्फ चिकु गणेश पालवे (रा. नांदगाव ता. बोदवड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल, गावठी कट्टा व काडतुस आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here