एलसीबी आणि पारोळा पोलिसांच्या कारवाईत 12 लाख रुपयांचा गांजा जप्त 

On: November 8, 2024 8:50 AM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 12 लाख रुपये किमतीची 120 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री शिवारात करण्यात आलेल्या या कारवाई प्रकरणी अरुण दोधू कोळी याच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, अमरसिंग विसावे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, सुनील हटकर, संदीप सातपुते, प्रवीण पारधी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment