विस हजाराच्या लाचेचा वायरमनला शॉक

जळगाव : अगोदर दहा हजार रुपयांची लाच स्विकारुन उर्वरीत ठरलेली विस हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्विकारणा-या वायरमनला जळगाव एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. विस हजार रुपयांसाठी अडून बसून कनेक्शन न देता लाच मागणीवर ठाम असलेल्या वायरमनला एसीबी पथकाने कारवाईचा शॉक दिला आहे.  विक्रांत अनिल पाटील असे जळगाव तालुक्यातील शिरसोली युनिटच्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. त्याच्याकडून लाचेची विस हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. वायरमन विक्रांत पाटील विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सापळा व तपास अधिकारी तथा उप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ना. किशोर महाजन, पो.कॉ. राकेश दुसाने आदींनी या कारवाईत  सहभाग घेतला. सर्व नागरीकांना जळगाव एसीबी कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांना त्यांच्या शासकीय कामासाठी कुणी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने कुणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असल्यास अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव या कार्यालयाशी संपर्क साधावा. अथवा 0257-2235477 या लॅंड लाईन क्रमांकावर, 9702433131 या मोबाईल क्रमांकावर अथवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here