शोविक-रियाची ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रियासह शोविक या दोघांवर सुशांतच्या वडीलांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैजान इब्राहीम, जैद आणि बासित परिहार यांना अटक करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह कथित आत्यमहत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) शोविक चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती यांना सोबत बसवून चौकशी करणार आहे. दरम्यान ड्रग्ज कनेक्शनच्या प्रकरणी शोविक चक्रवर्ती 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये राहणार आहे. मिरांडाला देखील 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवण्यात आले आहे. कैजान 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

एनसीबीने शुक्रवारी रात्री उशीरा रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक, सुशांतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला अटक केली. दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एनसीबीच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. एनसीबीने 7 दिवसांची रिमांड न्यायालयास मागितली होती. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here