गावठी कट्ट्यासह शुभम अहिरे जेरबंद

जळगाव : गावठी कट्टा बाळगून परिसरात दहशत माजवणा-या तरुणास रामानंद नगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. शुभम उर्फ मनी दिनेश अहिरे असे गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आलेल्या हरिविठ्ठल नगर परिसरातील रहिवासी असलेल्या तरुणाचे नाव आहे.  

गिरणा टाकी परीसर कंपाऊंडजवळ एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सफौ संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, पोहेकॉ सुशिल चौधरी, पोहेकॉ जितेंद्र राजपुत, पोहेकॉ  जितेंद्र राठोड, पोना हेमंत कळसकर, पोना रेवानंद साळुखे, पोना विनोंद सुर्यवंशी, पोकॉ. रविंद्र चौधरी, उमेश पवार जुलालसिंग परदेशी आदींच्या पथकाने गिरणा टाकी परिसरात जावून संशयास्पद अवस्थेत फिरत असलेल्या शुभम उर्फ मणी दिनेश अहिरे यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात गावठी कट्टा आढळून आला. त्याला अटक करण्यात आली.

अटकेतील शुभम याच्याविरुद्ध यापुर्वी विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा वचक आणि सामान्य जनतेच्या मनात निर्भयतेची भावना कायम रहावी यासाठी त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here