“इपिक” फोटो प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

On: November 15, 2024 6:25 PM

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जैन इरिगेशनमधील सहकारी जगदीश चावला व तुषार बुंदे यांच्या इपिक फोटो  प्रदर्शनाचं आयोजन आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

या प्रदर्शनात समाविष्ट छायाचित्रांमध्ये दृष्य कथा, बोलक्या गोष्टी, साजरे होणारे उत्सव इत्यादी विविध विषयांचा समावेश आहे. येथे प्रदर्शित केलेल्या चित्रांचा संग्रह प्रेरणादायी आणि मोहक असाच ठरणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन १६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत खुले असणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि या दोन्ही कलाकारांच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी जळगाकरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक तुषार बुंदे व जगदीश चावला यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment