धावत्या रेल्वेखाली अनोळखी इसमाची आत्महत्या – ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : धावत्या रेल्वेसमोर उभा राहून स्वत:ला झोकून देत आत्महत्या करणा-या अनोळखी इसमाच्या मृतदेहाचे छिन्नविच्छीन्न तुकडे झाले असून त्याची व वारसाची ओळख पटवण्याचे आवाहन रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या घटने प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

18 नोव्हेंबर रोजी हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे खांब क्रमांक 415/21 ते 415/23 दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली. जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक संजु जाधव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रामानंद नगर पोलिस स्टेशनला 62/24 या क्रमांकाने भारतीय न्याय संहिता कलम 194 नुसार अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. अनोळखी मयत इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष असून त्याने काळे ठिपके असलेला पांढ-या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता.

घटनास्थळावर त्याने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्मल पॅंटचे तुकडे व पॅरॉगॉन लेबल असलेली काळी चप्पल आढळून आली आहे. या अनोळखी इसमाची कुणाला काही माहिती असल्यास वारसाची ओळख पटवण्याकामी रामानंद नगर पोलिस स्टेशनला 0257 2282864 या दुरध्वनी क्रमांकावर अथवा हे.कॉ. प्रशांत पाटील यांच्याशी 9689896557 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here