आजचे राशीभविष्य (6/9/2020)

On: September 6, 2020 7:56 AM

आजचे राशीभविष्य

मेष
आशावादी राहून चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळणार असल्यामुळे आपल्या आशा – आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. सहलीला जाण्याचा बेत होवू शकतो.
वृषभ
आर्थिकदृष्ट्या आज तुम्ही सक्षम असू शकता. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची संधी मिळू शकते.
मिथुन
रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस योग्य दिवस आहे. एखाद्या बड्या व्यक्तीसोबत निकटचा संपर्क होवू शकतो.
कर्क
आज तुम्ही एकदम तणावमुक्त राहू शकाल. मौजमजा करण्याचा तुमचा मूड होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सोबत टीनएजच्या रुपात मौज कराल
सिंह
परिस्थिती नियंत्रणात आली म्हणजे तुमची चिंता नाहिशी होईल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर काही प्रमाणात लक्ष द्या. मुलांसोबत वेळ द्या.
कन्या
विदेशातील तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. त्यातून तुम्हाला चांगला नफा होईल. जोडीदारासोबत जुन्या दिवसांची आज पुन्हा उजळणी कराल.
तुळ
आज वैवाहिक जीवनात एक उत्तम भोजन आणि छान झोप मिळणार आहे. आज तुम्ही एखाद्या मित्रासमवेत अथवा नातेवाईकासमवेत आपले अनुभव शेअर करू शकतात.
वृश्चिक
खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा अन्यथा निष्काळजीपणा तुमच्या आजाराचे कारण होवू शकतो. जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
धनु
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचण भासत आहे. ती चणचण आज कुठून तरी धनप्राप्ती झाल्याने कमी होवू शकते.
मकर
मनातील नकारात्मक विचार झटकून सकारात्मह विचारांचा अंगिकार करा. महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्याने नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कुंभ
आपणास प्रोत्साहित करणारे घटक समजून घ्या. आज तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा.
मीन
अनुशासन ही यशाची महत्वाची पायरी असते. घराच्या वस्तूंना व्यवस्थित व निटनेटके ठेवल्याने जीवनात अनुशासनाची सुरवात होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment