अवैध गावठी पिस्टलसह एकास अटक

On: November 24, 2024 4:39 PM

जळगाव: जळगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रात्री उस्मानिया पार्क परिसरातील सवलत किराणा दुकानाजवळ गोपनीय बातमीच्या आधारे नमीर खान आसीफ खान याला गावठी पिस्टल सह अटक करण्यात आली आहे.

त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि मॅग्झिन तसेच दोन हजार रुपये किमतीचे रिकामे मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमिर खान याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, हे कॉ सुधाकर अंभोरे, अकरम शेख, राहुल पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment