आयपीएलचे वेळापत्रक आज होणार जाहीर

On: September 6, 2020 9:45 AM

नवी दिल्ली : आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत ही लीग सुरु होण्यास १४ दिवस शिल्लक राहिले आहेत. कोरोनामुळे आठही संघांच्या समस्येत भर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांना वेळापत्रकाची उत्सुकता लागून आहे.

दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे हे सामने होणार आहे. सर्व संघ स्पर्धेच्या ठिकाणी हजर झाले आहेत. नियमावलीप्रमाणे विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून खेळाडू सरावाला लागले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सने कोरोनाच्या तीन चाचण्यांचा टप्पा पुर्ण केला आहे. त्यानंतर शुक्रवारी सराव सुरु करण्यात आला. या संघातील दोघा खेळाडूंसह तेरा सदस्य पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्या खेळाडूंना संघापासून वेगळे ठेवले आहे. सुरेश रैना आणि हरभजनसिंग या दोन खेळाडूंनी माघार घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment