जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी आणि चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार निखील उर्फ भोला सुनिल अजबे अशी दोघांची नावे आहेत. गुरुजितसिंग याच्याविरुध्द भारतीय दंड विधान अंतर्गत एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. तसेच निखील अजबे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान अंतर्गत एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत.
गुरुजितसिंग बावरी याच्याविरुद्धचा प्रस्ताव पो.नि. दत्तात्रय निकम व त्यांच्या सहका-यांनी तयार केला होता. निखील उर्फ भोला सुनिल अजबे याच्याविरुद्धचा प्रस्ताव पो.नि. किरणकुमार कबाडी व त्यांच्या सहका-यांनी तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड व त्यांच्या सहका-यांनी या प्रस्तावाला मुर्त स्वरुप देत पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केलेल्या या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली. गुन्हेगार गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोउनि शरद बागल, पोउनि अशोक काळे, पोना योगेश बारी, किशोर पाटील, पोकॉ छगन नलावडे, किरण पाटील आदींनी गुरुजितसिंग बावरी याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील श्रेणी पोलिस उप निरीक्षक सुभाष पाटील, पोहेकॉ योगेश मांडोळे, राहुल सोनवणे, भुपेश वंजारी, पोकॉ. नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, राकेश महाजन, पवन पाटील, नितेश पाटील आदींनी गुन्हेगार निखील अजबे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील हे.कॉ. सुनिल पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, संदिप चव्हाण, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहभाग घेतला.