जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. 3 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत सायंकाळी 7 ते 11 या वेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात होणार आहे. या संगीत महोत्सवाचे यंदा आकर्षण युवा कलाकार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी दिली.
बालगंधर्व संगीत महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यावेळी विश्वस्त चांदोरकर बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट, सचिव अरविंद देशपांडे व जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. चांदोरकर म्हणाले की, दि. 3 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन बंगळूर येथील रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे