जळगाव : व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारा नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून दोघांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल नंदकिशोर साखला (रा.पतंग गल्ली जोशी पेठ जळगाव) आणि किरण भगवान राठोड (रा. पतंग गल्ली जोशी पेठ जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
कुणाल साखला याच्या ताब्यातून 9 हजार 50 रुपये किमतीचा आणि किरण राठोड याच्या ताब्यातून 4800 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी पंढरीनाथ नरवाडे, पोहेकॉ हरीलाल लक्ष्मण पाटील, प्रदिप सुकदेव सपकाळे, प्रदिप सिताराम चवरे आदींनी या तपासकामी व कारवाईत सहभाग घेतला.