धुळे : नाशिक परिक्षेत्रातील पोलिस दलाची सन 2024 – 25 ची वार्षिक निरीक्षक तपासणी आयजी पथकाकडून सुरु आहे. धुळे जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणी अहवालात पोलिस मुख्यालयाच्या रोजकीर्द मधे अपुरी नोंद आढळून आली. या प्रकरणी पोलिस मुख्यालयाच्या कनिष्ठ श्रेणी महिला लिपिक मनीषा देसले यांच्यावर कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी लिपिक मनीषा देसले यांना निलंबित केले आहे. त्यांचा पुढील तीन वर्षांचा वाढीव भत्ता रोखून त्यांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
वार्षिक तपासणीत मनीषा देसले यांच्याकडील रोजकिर्दीत 19 ऑक्टोबर 2025 पर्यंतचीच नोंद आढळून आली. तसेच जमाखर्च नस्तीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे आयजी दत्तात्रय कराळे यांनी त्यांच्या तत्काळ निलंबनाचे आदेश काढले. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी धुळे शहर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.