एमबीए प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखात फसवणूक

काल्पनिक छायाचित्र

पुणे : संचालकांशी आपला थेट संबंध असल्याची बतावणी करत एमबीएला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची ६५ लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत कोथरुड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबर अनीष चॅटर्जी, अयान अनीष चॅटर्जी, आरती अनीष चॅटर्जी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हडपसर येथील २१ वर्षाच्या तरुणाने या बाबत फिर्याद दाखल केली आहे. कोथरुडमधील एमआयटी कॉलेजच्या आवारात डिसेंबर २०१९ ते १२ ऑगस्ट २०२० दरम्यान हा प्रकार घडला़ आहे. फिर्यादी व आरोपी अंबर चॅटर्जी हे वर्गमित्र असून ते एमआयटीमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत़. अंबरचा भाऊ अयान चॅटर्जी याने फिर्यादीला लवळे येथील सिम्बॉयोसिस कॉलेजच्या प्रमुखांसोबत आपला थेट संपर्क असल्याचे भासवले. अयान याने फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने इतर आरोपींच्या मदतीने मॅनेजमेंट कोट्यातून एमबीएला प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन फिर्यादीला दिले.

फिर्यादीला ई मेल आयडी तसेच लिंकवरुन सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे खोटे व बनावट मेल पाठवून एम बी ए अ‍ॅडमिशन केल्याचे भासवून स्वत:च्या बॅक खात्यावर रोख रक्कम स्विकारली.सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती व तात्पुरते प्रवेश पत्र देखील पाठवले. त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेत फसवणूक केली़. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पैसे परत मागितले. त्यावेळी फिर्यादीस शिवीगाळ करुन धमकावल्याबाबत कोथरुड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here