जळगाव : जिल्ह्यातील रिफॉर्मेशन कमिटीतर्फे नुकतेच जळगाव शहरातील फातेमा नगरात व्हॅलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुले-मुली आणि खुला अशा तीन गटात स्पर्धा पार पडली.
रिफॉर्मेशन कमिटीतर्फे लवकरच क्रिकेट सामने आयोजित केले जाणार असून त्या अनुषंगाने फातेमा नगरात व्हॅलीबॉल स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. प्रसंगी डॉ . अब्दुल करीम सालार, मजीद जकरिया, चांद खान, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, शुभम पाटील, योगेश पाटील यांची उपस्थिती होती.
असा आहे निकाल
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात जळगाव मनपा शाळा क्र. ३६ यांनी पारितोषिक पटकावले. मुलांच्या गटात जळगाव मनपा शाळा क्र. ३६ यांनी पारितोषिक पटकावले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात इकरा स्पोर्टस अकॅडमी यांनी पारितोषिक पटकावले. खुल्या गटात इकरा स्पोर्टस अकॅडमी यांनी बाजी मारली. उपक्रमासाठी सैफ अली, शादाब अली, तनवीर शेख आणि जीशान शेख यांनी परिश्रम घेतले.