कंगना राणौतला हिमाचल प्रदेश शासन सुरक्षा देणार

On: September 6, 2020 9:44 PM

शिमला : शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. त्यामुळे आक्रमक शिवसेनेकडून कंगनाला थेट इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश शासनाने कंगनाला संरक्षण देण्याचे ठरवले आहे. या संदर्भात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना राज्याच्या डीजीपींना देण्यात आले असल्याचे देखील ठाकूर यांनी सांगितले आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश सरकारकडे आपल्या सुरक्षेसाठी मागणी केली होती. कंगनाला सुरक्षा पुरवण्यासाठी तिच्या वडिलांनी डीजीपींनी पत्र लिहिले होते. कंगना हिमाचल प्रदेशची कन्या असल्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याचे ठाकूर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment