सात रेल्वे गाड्या 18 डिसेंबर रोजी रद्द

जळगाव : नागपूर विभागातील सिंदी रेल्वे स्थानक आणि यार्ड दरम्यान नॉन- इंटरलॉकिंग आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवार, दि.१८ रोजी या लोहमार्गावरील सात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सिंदी स्थानक परिसरात यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. याशिवाय नागपूर-वर्धा विभागात तिस-या आणि चौथ्या लोहमार्ग, लाँग हॉल लूपसाठी महत्त्वाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंगची कामे केली जात आहेत. त्यामुळे बुधवार, दि.१८ रोजी पुढील गाड्या रद्द असतील. क्र. ०१३७१ अमरावती वर्धा मेमू, ०१३७२ वर्धा अमरावती मेमू, १११२१ भुसावल वर्धा एक्स्प्रेस, १११२२ वर्धा भुसावल एक्स्प्रेस, – १२११९ अमरावती अजनी एक्स्प्रेस, १२१२०० अजनी अमरावती एक्स्प्रेस, १२१५९ अमरावती – जबलपुर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस १८ रोजी वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेशन्स करण्यात येईल. ही गाड़ी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द राहील. ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दि. १८ रोजी वर्धा स्टेशन येथून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाड़ी गोंदीया ते वर्धा दरम्यान रद्द राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here