आजचे राशी भविष्य (7/9/2020)

आजचे राशी भविष्य
मेष

जीवनातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. काळजी करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल.

वृषभ
सर्व अडचणी, समस्यांवर हसत खेळत मात करणे हाच उत्तम उपाय आहे. तुमचे जुन्या व्याधी पुढे आल्यामुळे तुम्हाला दवाखान्यात देखील जावे लागू शकते.

मिथुन
एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम बहरलेले असू द्या. बहुतेक घटना मनाप्रमाणे घडतील. त्यामुळे आजचा दिवस उत्साहवर्धक व प्रसन्नदायी असेल

कर्क
आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात सहभाग घ्या. आज काही आर्थिक अडचणी दूर होवू शकतात.

सिंह
एखाद्या मित्र अथवा नातेवाइकाच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यवसायात प्रगती करू शकतात. आपल्या ख-या भावना अचूकपणे सांगणे योग्य राहील. आज तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात रहाल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला स्वत:साठी पुरेसा वेळ मिळेल.

तुळ
आज तुमच्या महत्वाच्या कामात प्रगती दिसून येईल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे चुकीचे ठरु शकते.

वृश्चिक
दैनंदिन व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. आपल्या प्रिय व्यक्तीशी शालीनतेने वागा.

धनु
विवाह इच्छूकांसाठी संबंध जुळून येतील. मनोरंजनासाठी चांगला दिवस. जगातील श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल.

मकर
विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबात वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव बदलण्याची गरज आहे.

कुंभ
तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद आणि उत्साह निर्माण करतील. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने राहणार आहेत.

मीन
दिवसाची सुरवात योग साधनेने करू शकतात. आज संपूर्ण दिवस उत्साहाचा राहिल. आर्थिक करारांना अंतिम रुप मिळाल्याने अर्थपुरवठा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here