कुंटणखान्याचा चित्रकुट जळगावला उघडकीस

जळगाव : जळगाव – भुसावळ दरम्यान गोदावरी इंजिनिअरिंग महाविद्यालयानजीक हॉटेल चित्रकुट येथे सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी पंटर कारवाई केली आहे. या कारवाईसह धाडीत एका बांगलादेशी तरुणीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीचे जळगाव येथे बेकायदा वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.   

कारवाई दरम्यान नजीकच्या हॉटेल यश मधे देखील एक महिला असल्याची माहिती समजल्यानंतर खात्री केली असता त्याठिकाणी एक महिला आढळून आली. हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्या माध्यमातून हॉटेल चित्रकुटमधे बांगलादेशी तरुणी आली असल्याचे समजते. पोलिसकर्मी गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांसह बांगलादेशी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या पथकातील स.पो.नि. गणेश वाघ, डीवायएसपी कार्यालयाचे पो.हे.कॉ. विकास महाजन, सुहास पाटील, पोकॉ गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here