संभाजी देवरे यांची निवड

On: September 7, 2020 8:34 AM

जळगाव : भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टल सोशल मीडिया प्रमुख पदी अमळनेर येथील संभाजी सुकलाल देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंटी दिलेर नेतलेकर यांच्या हस्ते संभाजी देवरे यांना नियुक्ती पत्र देण्यात येवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

सामाजिक बांधिलकीने तळागाळातील समविचारांना एकत्रीत आणणे, देश व जनहितार्थ सत्यनिष्ठेने, प्रामाणिकणे कार्य करून संघटनेच्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी भारत सरकार मान्यताप्राप्त, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने ही जबाबदारी संभाजी देवरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल संघटनेचे पदाधिकारी व सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment