मुंबई : मी मुंबईला येत आहे. कुणाची हिंमत असेल तर रोखून दाखवा. असे आव्हान अभिनेत्री कंगनाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे ठरवले आहे. आता कंगनाच्या कार्यालयाची मुंबई मनपाकडून पाहणी सुरु आहे. कंगनाचे पाली हिलमधील कार्यालय अनधिकृत तर नाही? याची पाहणी महापालिकेकडून सुरु झाली आहे.
९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत दाखल होणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असं थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे. या पार्श्वभुमीवर आज केंद्राकडून तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. मुंबईच्या खार भागात कंगनाचे निवासस्थान आहे. पाली हिल परिसरात तिचे कार्यालय आहे. या कार्यालयाची आज मुंबई मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यालय अनधिकृत आहे का? रस्त्यावर अतिक्रमण आहे का? याची तपासणी करण्यासाठी अधिकारी येवून गेले.
कंगनाच्या कार्यालयात सध्या रंग देण्याचे काम सुरु आहे. कार्यालयाच्या शेजारी असलेल्या बंगल्यांचीदेखील पाहणी यावेळी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी शेजारी असलेल्या रस्त्यांचे देखील मोजमाप केले. आता महापालिका काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा ज्यांना देण्यात येते त्यांच्या सुरक्षेसाठी ११ जवान तैनात असतात. यात १ अथवा २ कमांडो, २ पीएसओ यांचा त्यात समावेश असतो. गेल्या वर्षी केंद्राने अकराहून अधिक लोकांना वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यामधे युपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा समावेश होता. आता कंगनासाठी १ किंवा २ कमांडो, २ पीएसओ व अन्य जवानांचा समावेश राहणार आहे. एकूण ११ जवान सुरक्षेसाठी तैनात असतात.