विद्यार्थ्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

On: December 30, 2024 3:03 PM

पुणे : इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर चक्क शाळेतीलच शिक्षिकेनेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी 27 वर्षाच्या संबंधित शिक्षिके विरुद्ध पोक्सो अंतर्गत खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

या खळबळजनक घटने प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार दहावीच्या वर्गातील पीडित मुलगा पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केले. सीसीटीव्ही फुटेज तपासणीअंती संबंधित शिक्षिका आणि विद्यार्थ्यांकडे वेगवेगळी चौकशी करण्यात आली.  संबंधित शिक्षिका आणि पीडित विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment