धुळे : विवाह सोहळ्यात रिसॉर्टमधून चोरी झालेले 26 तोळे सोन्याचे दागिने मोहाडी पोलिसांनी एक महिन्यानंतर शिताफीने हस्तगत केले आहे. धुळे शहर परिसरात असलेल्या एका रिसॉर्ट मधे लग्न समारंभात संगीत कार्यक्रम सुरु असतांना हा दागिने चोरीचा प्रकार घडला होता.
नव- वधूच्या दागिन्यांची पर्स एका अल्पवयीन मुलाने चोरी केली होती. मोहाडी पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातील राजगढ जिल्ह्यातील गुलखेडी गावानजीक असलेल्या जंगलातील एका झोपडीत धाड टाकून चोरीचे 26 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले. केले. मात्र सुत्रधार टोळी मात्र फरार होण्यात यशस्वी झाली आहे. पोलीस पथक टोळीच्या मागावर आहे.