जळगाव : सुरुवातीला दिड लाख आणि तडजोडीअंती एक लाखाची लाच मागणी करणाऱ्या दोघां वायरमन विरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज वायरमन आणि गोटू वायरमन असे लाच मागणाऱ्या दोघा वायरमनचे नाव आहे.
दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने एका ग्राहकाचे एकुण पाच वीज मीटर काढून घेतले होते. ते सर्व वीज मीटर नादुरुस्त असून तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा नसेल तर आम्हाला दीड लाख रुपयांची लाच द्यावी लागेल असे दोघा वायरमनांनी त्या ग्राहकास सांगितले.
याप्रकरणी त्या वीज ग्राहक तक्रारदाराने 3 डिसेंबर रोजी जळगाव एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची एसीबी पथकाने पडताळणी केली असता तडजोडीअंती एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दोघांनी दाखवली असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पो.नि. नेत्रा जाधव तसेच सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक किशोर महाजन, बाळू मराठे, पोकॉ प्रदिप पोळ, अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.