जळगाव : डॉक्टरच्या घरातून सोन्याच्या बिस्किटांसह 20 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी मोलकरणीला 3 जानेवारी पर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीतील मोलकरणी छाया विसपुते हिच्याकडून चोरीचे पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान डॉक्टरच्या घरातून अजून काही वस्तूंसह रोकड चोरी झाली आहे का याचा देखील याची चौकशी व तपास सुरु आहे.
विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरात काम करणाऱ्या छाया विसपुते या मोलकरणीने मे 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत विस लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोलकरणीला अटक करण्यात आली. अधिक तपास सुरु आहे.